Chandrashekhar Bawankule : भाजप कार्यकर्त्यांच्या व्हॉट्स अॅपवरही बावनकुळेंचा वॉच, भंडाऱ्यातील वक्तव्यानं मंत्री महोदय गोत्यात!

Chandrashekhar Bawankule : भाजप कार्यकर्त्यांच्या व्हॉट्स अॅपवरही बावनकुळेंचा वॉच, भंडाऱ्यातील वक्तव्यानं मंत्री महोदय गोत्यात!

| Updated on: Oct 24, 2025 | 9:34 PM

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाळत ठेवल्याचे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वाद निर्माण झाला असून विरोधकांनी बावनकुळेंना अटक करण्याची मागणी केली आहे. व्हॉट्सॲप पाळत म्हणजे काय आणि त्याचे कायदेशीर नियम काय, यावर चर्चा सुरू झाली आहे.

भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भंडाऱ्यातल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना बावनकुळे यांनी भंडाऱ्यातले सर्व व्हॉट्सॲप सर्व्हिलन्सवर टाकले आहेत असे म्हटले. या धक्कादायक वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी असे राऊत म्हणाले. व्हॉट्सॲप सर्व्हिलन्सवर टाकणे म्हणजे मेसेज, कॉल्स आणि इतर हालचालींचे मॉनिटरिंग करणे. मात्र, कोणताही फोन सर्व्हिलन्सवर टाकण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव कोर्टाची किंवा ॲडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांची परवानगी घेणे आवश्यक असते. बावनकुळे यांचे हे वक्तव्य नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

Published on: Oct 24, 2025 09:33 PM