‘मी मुंडे साहेबांमुळे सर्व मिळवलं…’, वाल्मिक कराडची पोस्ट अन् दमानियांचं ट्वीट तर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 21, 2025 | 10:31 AM

संतोष देशमुख यांच्या सर्व दोषींना शिक्षा होऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य तो न्याय करतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. दुसरीकडे बीडनंतर कराड प्रकरणात पुणे येथील एका भाजप नगरसेवकाची चौकशी झाली आहे.

वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली गेल्याने आता पुढची सुनावणी २३ जानेवारीला होणार आहे. तर दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतःवरचे आरोप खोटे ठरवत बीज जिल्ह्याची बदनामी सुरू असल्याचा आरोप केला. त्यावर अंजली दमानिया यांनी कराडने धनंजय मुंडेंबद्दल काय भावना व्यक्त केल्या होत्या. त्याचा एक फोटो शेअर केलाय. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराडने मुंडेंना मिठी मारली. १५ जुलै २०२३ चा हा कराडचा प्रोफाईल फोटो आहे. यासोबत त्याने मी साहेबांमुळेच सर्व मिळवलं असल्याचे म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणातील चौकशीचं लोण आता पुण्यापर्यंत येऊन पोहोचलंय. बीड जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली आता पुण्यातील भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीने चौकशी झाली. आरोपांनुसार ज्योती मंगल जाधव ही कराडची दुसरी पत्नी आहे. त्यांचीही कराड फरार असताना सीआयडीने तिचीही चौकशी केली होती. याच ज्योती जाधवच्या नावे कराडने पुण्यात संपत्ती खरेदी केली होती. तर या व्यवहारात याच भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची मध्यस्थी असल्याचा संशयावरून सीआयडीने दत्ता खाडे यांची चौकशी केली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 21, 2025 10:31 AM