‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, भाजप नेते आशिष शेलार यांचं कुणाला थेट खुलं चॅलेंज?

‘निवडणुकीची खुमखुमी असेल तर…’, भाजप नेते आशिष शेलार यांचं कुणाला थेट खुलं चॅलेंज?

| Updated on: Aug 26, 2023 | 6:23 PM

VIDEO | 'निवडणूक आयोग निवडणूक घेण्याचं काम करते. आम्ही कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत, जर निवडणुकीची खुमखुमी असेल तर...', भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना काय दिल थेट आव्हान?

मुंबई, २६ ऑगस्ट २०२३ | भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. निवडणूक आयोग निवडणुका घेण्याचं काम करते. आम्ही कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत. निवडणुक लढवायची खुमखुमी असेल तर रोहित पवार यांनी राजीनामा द्यावा, पोटनिवडणूक होऊद्या आम्ही तयार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, निवडणुक घेण्याचं काम निवडणूक आयोगाचं असतं. आयोग ज्यावेळी निवडणुका घोषित करेल, त्यावेळी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात आम्ही कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार आहोत. पवार यांना तरीही निवडणुकीची खुमखुमी असेल तर रोहित पवार यांनी राजीनामा द्यावा. पोटनिवडणूक घ्या आम्ही दोन हात करायला महायुती तयार आहोत, आम्ही रोहित पवारांचा पराभव करू असं आशिष शेलार यांनी म्हणत रोहित पवार तयार होतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Aug 26, 2023 06:11 PM