Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांना पुन्हा डिवचलं, ‘या’ शब्दाचा उल्लेख करत बोचरी टीका
VIDEO | राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यानं डिवचलं, महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर खोचक टीका केली आहे. तर कोण लांडगा या महाराष्ट्रात भांडण लावतो? असा सवाल उपस्थित करत हल्लाबोल केलाय
सोलापूर, १६ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांचे नाव न घेता पुन्हा एकदा भाजपचे नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र डागलं आहे. महाराष्ट्रातील लांडगा कोण आहे? हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर खोचक टीका केली आहे. तर कोण लांडगा या महाराष्ट्रात भांडण लावतो? कोणी रिपब्लिकन पार्टीचे तुकडे तुकडे केले? धनगराला एसटीऐवजी एनटीचा दाखला कोणी दिला? हे खाली बसलेले मेंडके ही सांगतील अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणासाठी काढलेली धनगर जागर यात्रेच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विझोरी येथे पहिली जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Published on: Oct 16, 2023 04:05 PM
