भाजप नेते निलेश राणे धनुष्यबाण हाती घेणार? कमळाऐवजी धनुष्यबाणावर लढणार?

| Updated on: Oct 21, 2024 | 10:59 AM

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता जागावाटप हे अंतिम टप्प्यात आलं आहे. अस असताना भाजपचे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजप नेते निलेश राणे हे २३ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. निलेश राणे हे कुडाळमधून इलेक्शन लढवण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, निलेश राणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास कुडाळमध्ये ठाकरे गटातील वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात संभाव्य लढतीची शक्यता आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी वर्षा बंगल्यावर दाखल होत एकनाथ शिंदे यांची तर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी दाट शक्यता आहे. जर निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर ठाकरे गटाचे वैभव नाईक हे दोघे कुडाळमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात एकूण ३ जागा आहेत त्यापैकी २ जागा भाजप आणि एक जागा शिंदेंची शिवसेना लढणार अशी चर्चा आहे. भाजपच्या दोन जागांपैकी कणकवलीच्या जागेवर नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निलेश राणेंसाठी नारायण राणेंची फिल्डींग सुरू आहे. ते कुडाळमधून इच्छूक असल्याने नारायण राणेंनी शुक्रवारी फडणवीसांची भेट घेतली. निलेश राणेंच्या उमेदवारीवरून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 21, 2024 10:59 AM