Pankaja Munde Video : ‘…म्हणून मी मस्साजोगला जात असताना मागे फिरले’, एका मुलाखतीत धसांवर निशाणा साधताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य

Pankaja Munde Video : ‘…म्हणून मी मस्साजोगला जात असताना मागे फिरले’, एका मुलाखतीत धसांवर निशाणा साधताना पंकजा मुंडेंचं वक्तव्य

| Updated on: Mar 12, 2025 | 1:06 PM

अचानक बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना मलाच लक्ष्य का केलं? असे एक न अनेक सवाल करत पंकजा मुंडेंचा धसांना सवाल

‘मी भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय नेता असताना सुरेश धस माझ्यावर थेट आरोप करतात’, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश धसांना समज द्यावी, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना केली. एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पकंजा मुंडे यांनी असं वक्तव्य केलंय. ‘सर्व कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली?’ असा सवाल करत धनंजय मुंडे यांच्याशी भेट गुपचूप का घेतली याचं उत्तर त्या आमदारांनी राज्याला दिलं पाहिजे असेही पंकजा मुंडे म्हणाल्यात. सुरेश धसांवर निशाणा साधताना पंकजा मुंडे म्हणाल्यात, ‘धनंजय मुंडे पालकमंत्री असताना सुरेश धस हे आमदार होते, त्यावेळी वाल्मिक कराडही काम करत होता. त्यावेळी वाल्मिक कराडविषयीची एकही तक्रार धस यांनी महायुतीच्या वरिष्ठांकडे का केली नाही?’ असा थेट सवाल देखील पंकजा मुंडे यांनी केला. तर अचानक मी मंत्री झाल्यावरच त्यांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? माझा आणि माझ्या पक्षाचा काहीही संबंध नसताना मलाच लक्ष्य का केलं? हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर हा विषय पेटत ठेवण्याचं कारण काय? 12 डिसेंबर रोजी मी मस्साजोगला देशमुख कुटुंबाची भेट घेण्यास मस्साजोगला निघाले होते. अर्ध्या रस्त्यात असताना आमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय देशमुखांना फोन लावला, तुम्ही आला आणि तुमच्या कोणी चुकीचं वर्तन केलं तर आम्हाला आवडणार नाही, असं धनंजय देशमुख म्हणाले. त्यामुळे मी मागे फिरले अशं मुंडे म्हणाल्यात.

Published on: Mar 12, 2025 01:06 PM