Manda Mhatre | आमदार गणेश नाईक मतदार संघातील कामे करीत नाही, मंदा म्हात्रे यांचा आरोप

| Updated on: Sep 22, 2021 | 10:02 AM

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपच्या (BJP) दोन आमदारांचं वैर पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र आहे. ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन, ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक मतदार संघातील कामे करत नाहीत, असा हल्लाबोल केला.

Follow us on

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) भाजपच्या (BJP) दोन आमदारांचं वैर पुन्हा एकदा उफाळून आल्याचं चित्र आहे. ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) यांच्या संघर्षाचा आता दुसरा अंक सुरू झाला आहे. कारण मंदा म्हात्रे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन, ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक मतदार संघातील कामे करत नाहीत, असा हल्लाबोल केला. थेट पत्रकार परिषद घेऊन हा आरोप मंदा म्हात्रे यांनी केल्याने आता गणेश नाईक काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नवी मुंबईतील दोन्ही भाजपा आमदारांमधील विस्तव गेल्या काही वर्षापासून जाता जाईना झाला आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही मंदा म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. गणेश नाईक यांच्या भाजपप्रवेशाने सुरु असलेली धुसफूस पुन्हा एकदा टोक गाठताना दिसत आहे. शहरातील दोन्ही आमदारांच्या भांडणात भाजपातील कार्यकर्ते मात्र पिसले जात आहेत.