उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही वडिलांचे तैलचित्र लावू शकले नाहीत, प्रवीण दरेकर यांचा निशाणा

| Updated on: Jan 23, 2023 | 9:14 AM

'गद्दार, बोके, खोके यांच्या पलीकडे एकनाथ शिंदे कोसो मैल दूर गेले आहेत. तुम्ही टोमणे मारत रहा, टीका करत रहा आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे पडलं आहे'

Follow us on

आजूनही सुधारण्याचे कोणतेही लक्षण दिसत नसून गद्दार, बोके, खोके यांच्या पलीकडे एकनाथ शिंदे कोसो मैल दूर गेले आहेत. तुम्ही टोमणे मारत रहा, टीका करत रहा आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे पडलं आहे. तुम्ही अडीच वर्ष महाराष्ट्राचं वाटोळं केलं, २५ वर्षात मुंबईची वाट लावली. आता आम्हाला विकास करायचा आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्ही तुमच्या वडिलांचे तैलचित्र लावू शकला नाहीत, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

बोरिवलीमधील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानाचे उद्घाटन केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाने हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला हिंदुत्व नको, बाळासाहेबांचा विचार नको आहे. बोरिवलीमधील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदानाचे उद्घाटन करणं तुम्हाला का जमले नाही? असा सवालही दरेकरांनी उपस्थित केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले असून आज सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.