Sanjay Raut : राज्याच्या विधानसभेवर भाजपने दरोडा घातला; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut BJP Election Allegations : शिवसेना संजय राऊत यांनी आज विधानसभा निवडणुकांवरून भाजपवर निशाणा साधला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही भाजपने चोरली, लुटली आणि दरोडा घातला. राहुल गांधी हे सातत्याने तेच सांगत आहेत आणि आम्ही सुद्धा तेच बोलत आहे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या लेखातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून भाजपवर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी देखील पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक भाजपने हायजॅक केल्याचा दावा केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी जे म्हटले आहे ते आम्ही पूर्वीपासूनच सांगत होतो. लाडकी बहीण योजनेच्या आडून भाजपने त्यांचे चांगभलं केलं आहे. राज्यात भाजपा आणि त्यांच्या टोळ्यांचा विजय होऊच शकत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक आम्ही जिंकल्यावर असे त्यानंतरच्या सहा महिन्यात काय घडले की ज्याच्यामुळे तुम्हाला इतका मोठा एकतर्फी विजय प्राप्त व्हावा? ते तर 25 जागा सुद्धा जिंकू शकत नव्हते, असा दावाही राऊतांनी केला आहे.
