BMC | भाजपचं मुंबई महापालिका विजयासाठी प्लॅनिंग, मराठी मतदारांसाठी ‘मराठी कट्टा’ सुरु करणार

BMC | भाजपचं मुंबई महापालिका विजयासाठी प्लॅनिंग, मराठी मतदारांसाठी ‘मराठी कट्टा’ सुरु करणार

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 12:51 PM

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपनं नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून मुंबईत 'मराठी कट्टा' ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुंबई भाजपनं नवी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून मुंबईत ‘मराठी कट्टा’ ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून ‘मराठी कट्टा’ संकल्पनेला सुरुवात होणार आहे. आमदार नितेश राणे आणि सुनील राणे यांच्याकडे ‘मराठी कट्टा’ आयोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. चेंबूर घाटला व्हिलेज येथे  पहिला ‘मराठी कट्टा’ आयोजित होणार आहे.  मराठी मुद्दा, मराठी भाषिकांच्या समस्या तसंच सत्ताधारी शिवसेनेने मराठी माणसावर केलेला अन्यायावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न मुंबई भाजप या संकल्पनेतून करणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्याची मुंबई भाजपची व्युहरचना असल्याचं बोललं जातंय.