Pakistan : पाकिस्तान पुन्हा हादरला, ऑपरेशन सिंदूरनंतर धडकी, आता लाहोरमध्ये स्फोटांचे आवाज; घडलं काय?

Pakistan : पाकिस्तान पुन्हा हादरला, ऑपरेशन सिंदूरनंतर धडकी, आता लाहोरमध्ये स्फोटांचे आवाज; घडलं काय?

| Updated on: May 08, 2025 | 10:03 AM

लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोट झालेत. यामुळे लोक घाबरले आणि घराबाहेर पडले आणि त्यांनी सांगितले की त्यांना धुराचे लोट त्यांच्या दिशेने येताना दिसले. यानंतर, माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथके वॉल्टन रोडवर पोहोचली.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा एकदा पाकिस्तान चांगलाच हादरलाय. पाकिस्तानातील लाहोर शहरात एकामागून एक अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत म्हटले आहे की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरात एकामागून एक असे तीन स्फोट झाले आहेत. या स्फोटांच्या आवाजाने लाहोरमध्ये एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. स्फोटाचे आवाज ऐकू येताच नागरिकांनी आपला जीव मुठीत घेऊन पळापळ केल्याचे दिसून आले.

लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन रोडवरील वॉल्टन विमानतळाजवळ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. तर लाहोर विमानतळ बंद करण्यात आला आहे. दरम्यान, एक दिवस आधी भारताने पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी हल्ले केले होते, त्यामुळे युद्धाची भीती वाढली आहे. अशातच भारतानेही आपली सुरक्षा वाढवली आहे. लाहोरमध्ये झालेला हा स्फोट अद्याप कोणत्या कारणाने झाले याचं कारण किंवा माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

Published on: May 08, 2025 10:03 AM