BMC Election 2025: मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदे सेना, अजित दादांच्या राष्ट्रवादीत कोणत्या जागांवर पेच?

| Updated on: Dec 24, 2025 | 12:28 PM

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. ४७ जागांवरून एकमत झाले नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही अजून निश्चित नाही. महायुतीमधील हा तिढा सोडवण्यासाठी तिसऱ्या फेरीची चर्चा होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची शक्यता आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. एकूण २२७ जागांपैकी १८० जागांवर एकमत झाले असले तरी, उर्वरित ४७ जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यापैकी ३० ते ४० जागांवर तिसऱ्या फेरीच्या चर्चेतून तोडगा निघण्याची शक्यता आहे. यानंतरही ज्या जागांवर एकमत होणार नाही, त्या जागांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः चर्चा करून निर्णय घेतील.

दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत महायुतीत लढायचे की नाही, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील सर्व पर्यायांवर विचार करून पुढील निर्णय घेतला जाईल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यावर सहमत झाले असले तरी, मुंबईबाबत अजित पवारांनी पर्याय खुले ठेवले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेत मात्र युती करून लढण्यावर एकमत झाले आहे.

Published on: Dec 24, 2025 12:28 PM