Dharmendra Passes Away : ‘शोले’चा वीरू काळाच्या पडद्याआड, ‘या’ सुपरहिट फिल्ममध्ये धर्मंद्र यांनी साकारली मुख्य भूमिका
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. शोलेसह अनेक अजरामर चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ही-मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली असून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. १९६० मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी शोले, धरमवीर, चुपके चुपके, मेरा गाव मेरा देश आणि ड्रीम गर्ल यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांना बॉलिवूडचे ही-मॅन म्हणून ओळखले जात होते. ॲक्शन आणि कॉमेडी दोन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र अखेर मृत्यूशी त्यांची झुंज संपली. त्यांच्या निधनाने एका महान कलाकाराला बॉलिवूडने गमावले आहे.
