BSF Soldier P. K. Sahu : पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं

BSF Soldier P. K. Sahu : पाकिस्तानने पी. के. साहूंना भारताच्या ताब्यात सोपवलं

| Updated on: May 14, 2025 | 1:54 PM

BSF Jawan PK Sahu Returns to India : बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने अटारी - वाघा सीमेवरून भारताच्या ताब्यात सोपवलं आहे.

बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात सोपवलं आहे. अटारी – वाघा सीमेवरून पी. के. साहू भारतात परतले आहेत. पी. के. साहू हे चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. पाकिस्तानचा एक रेंजर देखील भारताने यावेळी पाकिस्तानला सोपवला आहे.

पी. के. साहू यांनी काही दिवसांपूर्वी चुकून सीमारेषा ओलांडली होती आणि ते पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना पकडलं होतं. 23 एप्रिल रोजी हा प्रकार घडला होता. त्यांच्याकडील सगळी शस्त्रात्रं जप्त करुन पाकिस्तानने गेल्या 20 दिवसांपासून त्यांना ताब्यात ठेवले होते. दरम्यानच्या काळात भारत-पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे साहू हे पाकिस्तानच्या ताब्यातच होते. त्यानंतर आज साहू यांना पुन्हा भारताच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे.

Published on: May 14, 2025 01:54 PM