Shreeganganagar : श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक

Shreeganganagar : श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक

| Updated on: May 04, 2025 | 1:20 PM

राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील पाकिस्तान बॉर्डरवर पाकिस्तानच्या जवानाला अटक करण्यात आलेली आहे.

राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील पाकिस्तान बॉर्डरवर बीएसएफकडून पाकिस्तानच्या जवानाला अटक करण्यात आलेली आहे. या पाकिस्तानी जवानाचा भारताच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर बीएसएफकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या या जवानाची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून काय खुलासे समोर येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झालेला असताना पाकिस्तानच्या कुरापाती थांबत नाही आहेत. सीमेवर घुसखोरी आणि गोळीबार सुरूच आहे. त्यातच राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील पाकिस्तान बॉर्डरवर एका पाकिस्तानी जवानाला घुसखोरी करताना ताब्यात घेतलं आहे.

Published on: May 04, 2025 01:20 PM