Special Report | सीबीआयकडून प्रश्नाची सरबत्ती, तर समीर वानखेडे म्हणतात सत्यमेव जयते, नेमकं सत्य कधी बाहेर येणार?

| Updated on: Aug 01, 2023 | 1:04 PM

शनिवारी समीर वानखेडे यांची तब्बल पाच तास चौकशी पार पडल्याची माहिती मिळत आहे.ते सकाळी साडेदहा वाजता सीबीआय कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया ही दिली. चौकशी दरम्यान सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली.

Follow us on

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी समीर वानखेडेंनी 25 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्यासह इतर 5 जणांवर सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय. या आरोपांप्रकरणी एसनीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही सुरु केलाय. शनिवारी समीर वानखेडे यांची तब्बल पाच तास चौकशी पार पडल्याची माहिती मिळत आहे.ते सकाळी साडेदहा वाजता सीबीआय कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर जवळपास पाच तास त्यांची चौकशी झाली. यावेळी समीर वानखेडे यांनी सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया ही दिली. चौकशी दरम्यान सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली. सीबीआयने चौकशीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.या संपूर्ण प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा जबाब फार महत्वाचा आहे. त्यामुळे पूजा ददलानीच्या जाबाबानं सत्य बाहेर येणार का? यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट…