Manoj Jarange Video : ‘त्यांना तशी सवयच…’, सळईने चटके देणारा आरोपी जरांगेंसोबत! फोटो दाखवणाऱ्या भुजबळांवर निशाणा

Manoj Jarange Video : ‘त्यांना तशी सवयच…’, सळईने चटके देणारा आरोपी जरांगेंसोबत! फोटो दाखवणाऱ्या भुजबळांवर निशाणा

| Updated on: Mar 06, 2025 | 12:49 PM

धनगर समाजाच्या तरूणांला अक्षरशः निर्घृणपणे तप्त लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही… कोण करणार याचा निषेध? महाराष्ट्र चाललाय कुठे? असा सवाल करत एक न् अनेक फोटो छगन भुजबळांनी सभागृहात दाखवले.

जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आल्यानंतर सभागृहात छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. धनगर समाजाच्या तरूणांला अक्षरशः निर्घृणपणे तप्त लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही… कोण करणार याचा निषेध? महाराष्ट्र चाललाय कुठे? असा सवाल करत एक न् अनेक फोटो छगन भुजबळांनी सभागृहात दाखवले. यावेळी सळईने चटके देणारा हैवान मनोज जरांगे पाटलांसोबत असल्याचे फोटो दाखवत जरांगेंवर गंभीर आरोप देखील केला. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देत हल्लाबोल केलाय. ‘क्रूरपणे मारलं त्यामुळे त्या व्यक्तीचं समर्थन केलंलं नाही. आम्ही प्रामाणिक लोकं आहोत. आमच्यात संवेदनशीलता आहे. आमच्यावर चांगले संस्कार आहेत. असले भिकार चाळे आम्ही करत नाही पण काहींना सवय असते फोटो दाखवून जातीय तेढ निर्माण करायची.’, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे छगन भुजबळांवर निशाणा साधला आहे. तर धनगर आणि मराठा समाजाता जातीय तेढ निर्माण करण्याचा छगन भुजबळांचा प्रयत्न असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला असून असं कदापि होणार नसल्याचे म्हटलंय.

Published on: Mar 06, 2025 12:49 PM