Chhagan Bhujbal | त्या प्रश्नावर भुजबळांचे कानावर हात, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

Chhagan Bhujbal | त्या प्रश्नावर भुजबळांचे कानावर हात, अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jan 31, 2026 | 1:27 PM

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत आपले मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही यावर भुजबळ यांनी थेट भाष्य केलं नाही. मला याबाबत काही माहिती नाही, असं म्हणत त्यांनी हा विषय टोलवला. विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, असं भुजबळांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना पक्षातील सध्याच्या घडामोडींबाबत आपले मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार की नाही यावर भुजबळ यांनी थेट भाष्य केलं नाही. मला याबाबत काही माहिती नाही, असं म्हणत त्यांनी हा विषय टोलवला. विलिनीकरणाबाबत मला काहीही माहिती नाही, असं भुजबळांनी सांगितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्या उपमुख्यमंत्रीपद हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण या पदामुळे पक्षाला अधिक बळकट करण्याची संधी मिळेल. आजच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल, त्यानंतर बाकीच्या राजकीय निर्णयांवर चर्चा केली जाईल. त्याचबरोबर, सुनेत्रा पवार यांना विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री बनवणे योग्य आहे आणि मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रीपद ठरवणे याकडे लक्ष केंद्रित झाले आहे. सुनेत्रा पवार ह्या एकदा उपमुख्यमंत्री झाल्या की, बाकी निर्णयांसाठी चर्चा होईल आणि पुढील धोरण निश्चित होईल, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Published on: Jan 31, 2026 01:27 PM