100 गुन्हे दाखल केले तरी मी बोलतच राहणार, चित्रा वाघ यांचं स्पष्टीकरण
भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी गुन्हा दाखल केलाय. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी गुन्हा दाखल केलाय. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे.
