Devendra Fadnavis : ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना हनी ट्रॅपच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
काल पासून सभागृहात एक गोष्ट सुरू आहे. ती म्हणजे हनीट्रॅप. कोणता हनीट्रॅप यांनी आणला हेच मला समजत नाही. नाना भाऊंनी तर कुठला बॉम्ब आणला. पण आमच्यापर्यंत बॉम्ब आला नाही, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना लगावला आहे. आज सभागृहात बोलताना मुखायमंत्री फडणवीस यांनी हनीट्रॅपच्या मुद्यावर विरोधक आणि नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका करत खडेबोल सुनावले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कुठली घटना घडली तर ती मांडली पाहिजे. पण वातावरण असं तयार होतं आहे की, जी आणि माजी मंत्री म्हंटल्यावर सगळे एकमेकांकडे पाहताय. मात्र कोणत्याही आजी आणि माजी मंत्र्याच्या हनीट्रॅपची तक्रार नाही. अशा संदर्भातली एक तक्रार आलेली नाशिक संदर्भात. ती मागे पण घेतली. हॉटेल मालकाचा उल्लेख करता ते कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहे, असा थेट आरोपच यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.
