रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Devendra Fadnavis धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आज विधानसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाच्या सूचना केल्या आहे. यापुढे रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवलेच पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात आज विधानसभेत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असून यापुढे रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवलेच पाहिजे अशा सूचना केल्या आहेत.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत भोंगे बंद ठेवलेच पाहिजे. या प्रकरणी कुणालाही सरसकट भोंग्यांची परवानगी देणार नाही. सर्वांना भोंग्यांच्या आवाज मर्यादेचे पालन करावे लागेल. एका ठराविक कालावधीसाठी भोंग्यांची परवानगी दिली जाईल. भोंग्यांच्या आवाजाच्या परवानगीची तपासणी करण्याची जबाबदारी पीआयची असेल. दिवसा 55 डेसीबल आणि रात्री 45 डेसीबल इतकीच आवाजाची मर्यादा असेल, असे फडणवीस म्हणाले.
Published on: Mar 11, 2025 02:12 PM
