Operation Sindoor : मुरिदकेमधील हल्ल्याचा आवाज हा… भारताच्या एअर स्ट्राईकवर परदेशी पत्रकाराचा मोठा दावा, सांगितलं वास्तव

Operation Sindoor : मुरिदकेमधील हल्ल्याचा आवाज हा… भारताच्या एअर स्ट्राईकवर परदेशी पत्रकाराचा मोठा दावा, सांगितलं वास्तव

| Updated on: May 08, 2025 | 1:25 PM

भारतीय लढाऊ विमानांनी काल रात्री उशिरा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानी हवाई हद्द ओलांडल्याशिवाय पाकिस्तानमधील दहशतवाद्यांवर हे हल्ले केले. या अचूक हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या लाँच पॅड आणि मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले.

पाकिस्तानातील मुरिदकेमधील हल्ल्याचे आवाज इस्लामाबादपर्यंत पोहोचले, असं एका परदेशी पत्रकाराने सांगितले आहे. भारताकडून ऑपरेश सिंदूर अंतर्गत कऱण्यात आलेल्या कारवाईवर पाकिस्तानात उपस्थित असलेल्या परदेशी पत्रकाराने हा मोठा दावा केला आहे. इतकी मोठी भीषणतः आणि मोठा आवाज या एअर स्टाईकचा होता, असं पाकिस्तानात उपस्थित असलेल्या परदेशी पत्रकाराने म्हटलंय. भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तान पूर्णतः हादरलं असून पाकिस्तानला या भारताच्या ऑपरेशन सिंदूरची चांगलीच धडकी भरली आहे. भारताने बुधवारी मध्यरात्री पाकिस्तानात केलेल्या ९ ठिकाणी हल्ल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे मुरिदकेमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. त्याचे फोटोही समोर आले आहेत. दहशतवाद्यांचा तळ हल्ल्यानंतर कसा ढिगाऱ्यात बदलला आहे हे चित्रांमध्ये दिसून येते. सेनेच्या कालच्या पत्रकार परिषदेदरम्यान कर्नल सोफिया यांनी मुरिदके येथील तळात २००८ मध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, असे सांगितले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हा दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला आहे.

Published on: May 08, 2025 01:25 PM