Harshwardhan Sapkal | ना यांचं भगव्यावर प्रेम, ना हिरव्यावर… त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले

Harshwardhan Sapkal | ना यांचं भगव्यावर प्रेम, ना हिरव्यावर… त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले

| Updated on: Jan 26, 2026 | 1:50 PM

मुंब्र्याच्या नगरसेविका सेहेर शेख यांच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. 'संपूर्ण मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू' असं वक्तव्य जलील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हा सगळा जातीय दंगल ओढावून घेण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.

मुंब्र्याच्या नगरसेविका सेहेर शेख यांच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. ‘संपूर्ण मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू’ असं वक्तव्य जलील यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. हा सगळा जातीय दंगल ओढावून घेण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करतंय त्याचपद्धतीने भाजप आणि MIM पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणी भगव्याच्या अनुषंगाने बोलतंय तर कोणी हिरव्याच्या अनुषंगाने बोलतंय, ना ह्यांचं हिरव्यावर प्रेम आहे ना ह्यांचं भगव्यावर प्रेम आहे. हे फक्त लोकांची माथी भडकावण्याचं काम करत आहेत, असं म्हणत सपकाळ यांनी दोन्ही पक्षाचा आणि त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

Published on: Jan 26, 2026 01:48 PM