Kiran Kale Video : ‘खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही…’, ठाकरेंची मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार

Kiran Kale Video : ‘खरं हिंदुत्व काय असतं ते आम्ही…’, ठाकरेंची मशाल हाती घेताच किरण काळेंचा एल्गार

| Updated on: Feb 23, 2025 | 4:38 PM

काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.

काँग्रेसचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. तर खरं हिंदुत्व काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. ठाकरेंच्या सेनेमध्ये जाताच किरण काळे यांनी हा एल्गार पुकारलाय. तर प्रवाहाच्या विरुद्ध लढून शिवसेना संघर्ष करेल असंही काळे यांनी यावेळी म्हणाले. ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन मी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे बाळासाहेब हे आमच्यासाठी आदर्श स्थान आहे आणि त्यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन आज माझ्यासोबत हजारो अहिल्यानगरच्या बांधवांनी सुद्धा पक्ष प्रवेश केलाय पक्ष बळकट होईल मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदुत्वाच्या माध्यमातून या राज्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी आम्ही सगळेजण शिवसेना मजबूत करण्याचं काम करणार आहोत. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेशासाठी मोठी धावपळ सुरू आ. अनेक लोक उड्या मारतायत. परंतु आम्ही निर्णय घेतला की पुढची पाच वर्ष जरी आमची सत्ता नसणार आहे तरीसुद्धा आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध लढून संघर्ष करणार आहोत. या संघर्षाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान दिलंय त्याचं रक्षण करून खरं हिंदुत्व लोकांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्य माणसाचे दैनंदिन आयुष्यातले जे प्रश्न सोडवणं ही भूमिका सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणार आहोत, असंही काळे म्हणाले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Published on: Feb 23, 2025 04:38 PM