Rahul Gandhi : राज्यातील विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग, राहुल गांधींचा आरोप; केले 5 दावे
महाराष्ट्रामधील निवडणुकीमध्ये फिक्सिंग लेखा द्वारे राहुल गांधींचा गंभीर आरोप... निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवीपर्यंत राहुल गांधी यांनी लेखा तुण मोठा आरोप केलाय तर फिक्सिंगने निवडणुका होत राहिल्यास ते लोकशाहीवरचा विषप्रयोग असेल असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांवर राहुल गांधी यांचा लेख समोर आलाय. महाराष्ट्रामधिल निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा या लेखामधून आरोप करण्यात आला आरोपांच पुष्टीकरण करत राहुल गांधीकडन पाच दावे करण्यात आले. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालातील विसंगतीपणा ढळढळीत होता. निवडणूक आयुक्तांच्या निवडीवेळी सरन्यायाधीशांच स्थान कॅबिनेट मंत्र्यांना देण्याचा निर्णय सुद्धा संशयास्पद राहिला. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 8 कोटी 98 लाख नोंदणीकृत मतदार होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 9 कोटी 29 लाख मतदार होते तर 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 कोटी 70 लाख मतदार झाले. पाच वर्षात 31 लाख मतदारांची वाढ झाली मात्र नंतरच्या फक्त पाच महिन्यात 41 लाख मतदार वाढले हे अविश्वसनीय होतं, असं राहुल गांधी म्हणाले.
विरोधकांच्या प्रश्नांवर निवडणूक आयोग मौन राहिलं. हायकोर्टान मतदान केंद्रातील व्हिडिओग्राफी देण्याचे निर्देश दिले. सरकारन आयोगाशी सल्लामसलत करून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डवर प्रतिबंध घालण्यासाठी 1961 च्या नियमांमध्ये बदल केले. त्यामुळे निवडणुकीतील हेराफेरीचा हे नाटक वर्षानुवर्ष सुरू असल्याची शंका येते. या नोंदीच्या तपासणीमधून हेराफेरीची कार्यपद्धती उजेडात येण्याची देखील शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये हेराफेरीने एवढी खालची पातळी का गाठली, याचा अंदाज बांधण कठीण नाही. फिक्सिंगने संघ एखादा सामना जिंकू शकतो मात्र त्यामुळे संबंधित संस्थेवरील विश्वासाला कायमचा तडा जातो. मॅच फिक्सिंग केल्याप्रमाणे निवडणुका होणं हा कोणत्याही लोकशाही वरचा विषप्रयोगच म्हणाव लागेल, असंही राहुल गांधी म्हणाले.
