Ravindra Dhangekar Video : काँग्रेसला ‘हात’ दाखवत ‘धनुष्यबाण’ हाती घेणार? काँग्रेसने धंगेकरांना डावलंल? शिवसेना सन्मान राखणार?

Ravindra Dhangekar Video : काँग्रेसला ‘हात’ दाखवत ‘धनुष्यबाण’ हाती घेणार? काँग्रेसने धंगेकरांना डावलंल? शिवसेना सन्मान राखणार?

| Updated on: Feb 24, 2025 | 12:06 PM

शिवसेनेच ऑपरेशन टायगर पुण्यातही राबवलं जात असल्याचं दिसतेय. कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांचा व्हाट्सअप स्टेटस आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार असल्याचं वक्तव्य यामुळे धंगेकर कॉंग्रेसला राम राम ठोकणार असं बोललं जातंय.

कसब्याचा भाजपचा गड हिसकावून कॉंग्रेस मधून आमदार बनलेले रवींद्र धंगेकर आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरात सुरु झाल्या. एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांसोबतची धंगेकारांची भेट, धंगेकारांचं व्हाट्सअप स्टेटस यामुळे धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. दोन दिवसात आपण कार्यकर्त्यांशी बोलणार असल्याचं धंगेकारांनी सांगितलं आहे. रवींद्र धंगेकारांच्या या नाराजीचं कारण ठरली आहे पुण्यातील कॉंग्रेसची नवीन टीम. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर पुणे शहर कॉंग्रेस मध्येही बदल करण्यात आले. पुण्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकांची नेमणूक झाली त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांना स्थान देण्यात आलं नाही. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकारांनी विजय मिळवला. धंगेकर हे पुणे कॉंग्रेसचा चेहरा बनले होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर धंगेकर बॅकफूटवर आले. त्यातच धंगेकारांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंतांची घेतलेली भेट आणि भगव्या गमज्यासह ठेवलेला स्टेटस यामुळे धंगेकर कॉंग्रेसला राम राम ठोकणार असा दावा केला जातोय. धंगेकारांच्या भगव्या गमज्यावर धनुष्यबाण आला तर आम्हाला आवडेल असं सूचक वक्तव्य उदय सामंतांनी केला. तर धंगेकरना राजकीय दृष्ट्या जिवंत राहायचं असेल तर त्यांचा निर्णय असल्याचं ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे म्हणाल्या.

धंगेकारांचं जवळपास ठरल्यात जमा आहे. मात्र दुसरीकडे धंगेकारांच्या गळ्यातील भगवा हा महाराष्ट्र धर्माची ओळख आहे त्यामध्ये गैर काहीच नाही असं कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. शिवसेना, मनसे आणि कॉंग्रेस असा राजकीय प्रवास केलेले धंगेकर पुन्हा धनुष्यबाण हाती घेणार हे निश्चित मानलं जातंय तसं वातावरणही तयार केलं जातंय. आता फक्त कार्यकर्त्यांशी बोलण्याचा सोपस्कार ते पूर्ण करतील इतकंच, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Feb 24, 2025 12:06 PM