नाना पटोले-बाळासाहेब थोरात यांच्यातील वादावर तोडगा निघणार? पाहा काँग्रेसचा अहवाल काय…

| Updated on: Feb 22, 2023 | 10:17 AM

महाराष्ट्र काँग्रेस अंतर्गत वादाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षात अंतर्गत फेरबदल होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाहा...

Follow us on

नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस अंतर्गत वादाचा अहवाल तयार करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षात अंतर्गत फेरबदल होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस नेते रमेश चेंनीथला यांनी अहवाल तयार केलाय. चेनिथला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आज अहवाल सादर करणार आहेत. रायपूरच्या अधिवेशनात महाराष्ट्रातील पक्षांतर्गत वादावर चर्चा होणार आहे.  मल्लिकार्जुन खर्गे यांना आज अहवाल सादर केला जाणार आहे. 24 पासून रायपूरमध्ये काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. यात चर्चेची शक्यता आहे. अधिवेशनातील चर्चेनंतरही काँग्रेसमध्ये फेरबदल होणार नाही. थोरात-पटोले वादावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.