पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून पटोले यांचा सरकारवर निशाना, म्हणाले, ‘आका येतायत म्हणून…’

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावरून पटोले यांचा सरकारवर निशाना, म्हणाले, ‘आका येतायत म्हणून…’

| Updated on: Jul 29, 2023 | 8:37 AM

त्याचदरम्यान अधिवेशनाला सोमवार व मंगळवारी सुट्टी देण्यावरून विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अधिवेशन बंद ठेवण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारच्या हेतूवर सवाल केलाय.

मुंबई, 29 जुलै 2023 | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी विरोधकांत आणि सत्ताधरी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्र्यांमध्ये चांगलीच लागल्याचे पहायला मिळाले. पण त्याचदरम्यान अधिवेशनाला सोमवार व मंगळवारी सुट्टी देण्यावरून विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी अधिवेशन बंद ठेवण्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारच्या हेतूवर सवाल केलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्याच्या दौऱ्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी, राज्यात अशी कोणती परिस्थिती अलर्ट देण्यात आलाय की सोमवार, मंगळवार या दोन दिवसांसाठी अधिवेशन बंद ठेवण्यात आलंय? सरकारला नैसर्गिक आपत्तीचं घेणं-देणं नाही. परंतु दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात येत आहेत म्हणून तर दोन दिवस अधिवेशन बंद ठेवले जात तर नाही का? अशी शंका पटोले यांनी उपस्थित केला आहे.

Published on: Jul 29, 2023 08:37 AM