महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान माजवलं होतं यावरून धडा घेत अनेक देशांनी खबरदारी म्हणून तातडीने काही नियमात बदल केले आहेत.
मुंंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाला पुन्हा एकदा धडकी भरवली आहे. मागील दोन वर्षात कोरोनाने थैमान माजवलं होतं यावरून धडा घेत अनेक देशांनी खबरदारी म्हणून तातडीने काही नियमात बदल केले आहेत. हा नवा विषाणू सर्वात आधी दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. त्यानंतर अनेक देशांनी दक्षिण अफ्रिका आणि इतर काही देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
