Navi Mumbai | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून नवी मुंबईत गुन्हा दाखल

Navi Mumbai | भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरून नवी मुंबईत गुन्हा दाखल

| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 8:31 PM

नवी मुंबईत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. याप्रसंगी कोव्हिड नियमांकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करून गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई : कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रा आयोजकांवर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NRI सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपच्या 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरात यांचे सुद्धा नाव आहे. नवी मुंबईत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते. याप्रसंगी कोव्हिड नियमांकडे दुर्लक्ष करीत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करून गर्दी जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.