गौतमी पाटीलसाठी कायपण…, ‘तो’ व्हीडिओ अन् अटक; घुंगरु चित्रपटाची टीम रस्त्यावर उतरणार…

गौतमी पाटीलसाठी कायपण…, ‘तो’ व्हीडिओ अन् अटक; घुंगरु चित्रपटाची टीम रस्त्यावर उतरणार…

| Edited By: | Updated on: Feb 28, 2023 | 3:15 PM

Gautami Patil Viral Video : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हीडिओ प्रकरणाविषयी घुंगरु चित्रपटाच्या टीमने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.पाहा सविस्तर वृत्त...

माढा, सोलापूर : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा एक व्हीडिओ मागच्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. चेंजिंग रूममधील तिचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हायरल व्हीडिओ प्रकरणाविषयी घुंगरु चित्रपटाच्या टीमने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. “गौतमीचा असा व्हिडीओ काढणं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी गोष्ट आहे.मी दररोज गौतमीला सावरतो आहे. मात्र या गोष्टीमुळे ती फारच हताश झाली आहे.व्हीडिओ काढणाऱ्या शेअर करणाऱ्या सर्व संबधितावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहचून येत्या दोन दिवसात आरोपीला अटक करावी. अन्यथा राज्यभरात घुंगरु चित्रपटाची कलाकार,दिगदर्शक सर्वच टिम रस्त्यावर उतरणार आहे”, असा इशारा चित्रपटाचे निर्माते बाबासाहेब गायकवाड यांनी tv9 मराठी शी बोलताना दिला आहे.

Published on: Feb 28, 2023 03:15 PM