अजितदादांनी शरद पवारांच्या बाजुला बसणं टाळलं, स्वतःहून बदलली खुर्ची? बघा नेमकं काय घडलं?

अजितदादांनी शरद पवारांच्या बाजुला बसणं टाळलं, स्वतःहून बदलली खुर्ची? बघा नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 09, 2025 | 2:24 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. अशातच अजित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये अजित पवार यांची खुर्ची शरद पवार यांच्या बाजुला होती, मात्र त्यांनी ती बदलली. यामुळे सध्या चर्चांना उधाण आलंय.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठकीतील आसन व्यवस्थेत पुन्हा एकदा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार आणि अजित दादांच्यामध्ये आता बाबासाहेब पाटील यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडून कार्यक्रमातील या आसन व्यवस्थेत अदला-बदल करण्यात आली आहे. पुण्यात होत असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मधील कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते उपस्थित आहे. तर खुर्ची बदलानंतर सुद्धा शरद पवार यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याआधी देखील एका कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार यांची आसन व्यवस्था आजू-बाजूला होती तेव्हाही अजित पवारांनी आपले आसन बदलून घेतले होते.

Published on: Jun 09, 2025 02:24 PM