DCM Eknath Shinde : जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

DCM Eknath Shinde : जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Mar 14, 2025 | 6:16 PM

DCM Eknath Shinde On Jayant Patil : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मी नाराज नाही, मला बाहेर बोलायची चोरी झाली आहे, असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. माझं काही खरं नाही असं दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील म्हणाले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आज जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला आता बाहेर बोलायची चोरी झाली आहे. शक्तीपीठ रस्त्याला विरोध करण्यासाठी जो मोर्चा आला होता, त्यांच्यासमोर भाषण करताना मी हे विनोदाने बोललो होतो. हा सगळा राजू शेट्टी यांच्याशी चाललेला विनोदाचा भाग होता, असं त्यांनी म्हंटलं. तसंच आम्ही एका कुटुंबाचा भाग आहे. आम्ही एकमेकांना इशारे देत बसत नाही, असंही त्यांनी सांगितलं

दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी राजकारणात काम केलेलं आहे. शरद पवार यांच्या सोबत आहेत, त्यामुळे ते जे बोलले त्याचा अंदाज लावणं कठीण आहे.

Published on: Mar 14, 2025 06:16 PM