Eknath Shinde Video : ‘मला हलक्यात घेऊ नका, जनता त्यांना धक्का देणार’, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार
'कोण किती धक्के देतंय ते बघू, पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत', असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंकडून पलटवार करण्यात आलाय.
‘आता मी धक्का पुरुष झालो आहे, असे कोण किती धक्के देतंय ते बघुयात. यांना काय धक्के द्यायचे ते आता देऊद्यात. पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत. जपानमध्ये भूकंपाचे धक्के बसले नाहीत तर आश्चर्य व्यक्त केल जात, तसं आता उद्धव ठाकरे यांना धक्का बसला नाही तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. कोण किती धक्के देतंय ते बघू, पण आपण एकच धक्का असा देऊ की हे पुन्हा दिसणार नाहीत’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यावर एकनाथ शिंदेंकडून पलटवार करण्यात आलाय. ‘काही लोकं म्हणाले मी धक्कापुरूष झालोय. विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलं आहे.’, असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे किंबहुना पक्षातील चांगलं काम कऱणाऱ्या आणि पक्ष वाढवणाऱ्या नेत्यांना धक्का मारून बाहेर काढणाऱ्या पक्षाच्या नेत्याला जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.’, असं वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
