नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याचा ‘गुजरात पॅटर्न’, सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप

नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याचा ‘गुजरात पॅटर्न’, सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप

| Updated on: Jun 15, 2024 | 12:46 PM

नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न, पेपर फोडून हवे ते केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये बोली. त्यामुळे नीट परीक्षेतील भानगडींची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सामना अग्रलेखातून करण्यात आलीय.

NEET Exam Scam : आमदार खासदारांच्या फोडाफोडीप्रमाणे नीट परीक्षेचा पेपर फोडण्यासाठी ‘व्हाया गोध्रा’ हा गुजरात पॅटर्न वापरण्यात आला आहे. नीटचे पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखो रुपयांची बोली लागली. उत्तर-पश्चिम मुंबई, चंदिगढच्या निवडणुकीत ग्रेस देऊन मत-घोटाळा केला. त्याच पद्धतीने नीट परीक्षेतही ग्रेस घोटाळा केला. नीटचा पेपर फोडून जास्तीत जास्त गुण मिळवून देण्याची जबाबदारी वडोदरा येथील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकाने घेतली होती. ‘गुजरात पॅटर्न’ आणि उदंड टॉपर देणाऱ्या परीक्षेतील एकूणच भानगडींची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Published on: Jun 15, 2024 12:46 PM