Ajit Pawar ON ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

Ajit Pawar ON ST Strike | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवार नेमकं काय म्हणाले ?

| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 6:38 PM

एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.

पुणे: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता ही मागणी आली आहे. तुमचं विलीनीकरण केलं तर उद्या कोतवाल आणि पोलीस पाटीलही पुढे येतील, असं सांगतानाच तुटेपर्यंत ताणू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. विलीनीकरणाचं प्रकरण उच्च न्यायालयात आहे. हायकोर्टाने समिती स्थापन केली आहे. त्यामुळे थोडं थांबलं पाहिजे. एसटीच्या संपात पगारवाढीची मागणी होती. आतापर्यंत विलीनीकरणाची मागणी नव्हती. आता मात्र ही मागणी पुढे आली आहे. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण केलं तर उद्या पोलीस पाटील आणि कोतवालही पुढे येतील, असं पवार म्हणाले.