मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News… अमृता फडणवीस ट्वीट करत म्हणाल्या, मन भरून आलंय….

मुख्यमंत्र्यांचा ‘वर्षा’वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News… अमृता फडणवीस ट्वीट करत म्हणाल्या, मन भरून आलंय….

| Updated on: Apr 30, 2025 | 3:33 PM

'सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे', अशी पोस्ट अमृता फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून ते वर्षा बंगल्यावर कधी राहायला कधी जाणार? असा सवाल सातत्याने विरोधकांकडून केला जात असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र विरोधकांना उत्तर देत फडणवीस माझ्या मुलीची दहावीची परीक्षा झाल्यानंतर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान, अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केल्याचे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर दोन आनंदाच्या बातम्या दिल्यात. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस ही दहावी उत्तीर्ण झाली आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे. तर अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर करत दिविजा फडणवीस हिच्याबद्दल आनंदाची बातमी दिली आहे.

Published on: Apr 30, 2025 03:32 PM