Dilip Walse Patil | फडणवीसांची चौकशी, गृहमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर
दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशी प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशी प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं. एसआयटीतील (SIT) डेटा बाहेर कसा गेला याची चौकशी सुरू आहे. विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रीय सचिवांना पेन ड्राईव्ह दिला. पोलिसांनी केंद्रीय सचिवांना पत्रं पाठवून तो पेन ड्राईव्ह उपलब्ध करून द्या अशी मागणी केली आहे. तपास करताना सर्कल पूर्ण करावं लागतं. पोलिसांनी काही प्रश्न विचारले तरी उत्तर काय द्यायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे. हा रुटीनचा भाग आहे. मी कायदा शिकलो कदाचित माझ्या माहितीत फरक असेल. क्रिमिनल केसेसमध्ये कुणालही इम्युनिटी नाही. फडणवीसांना आरोपी म्हणून नोटीस नाही पाठवली. केवळ माहिती घेण्यासाठी नोटीस दिली. जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा किंवा कोणत्याही कटात फसवण्याचा सरकारचा संबंध नाही, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. तसेच तपास अधिकारी त्याबाबत चौकशी करेल. त्यावरून अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे हा विषय थांबवा, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी केलं.
