VIDEO : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस समोरासमोर, कोल्हापूरमध्ये शाहूपुरीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट

VIDEO : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस समोरासमोर, कोल्हापूरमध्ये शाहूपुरीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट

| Edited By: | Updated on: Jul 30, 2021 | 12:45 PM

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यावेळी दोघांनी एकमेकांशी चर्चा केली.

कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्र्यांची अचानक समोरासमोर भेट झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस शाहूपुरीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तिथे पोहोचले. यावेळी दोघांनी एकमेकांशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस आधी पोहोचले होते. लोकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. इतके दिवस कोणी आले नव्हते, तुम्ही आलात असं स्थानिक फडणवीसांना म्हणाले. त्याच वेळी उद्धव ठाकरेही शाहूपुरी इथे पोहोचले आणि आजी-माजी मुख्यमंत्र्यांची भेट झाली.