केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले…

केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले…

| Updated on: Jul 11, 2026 | 3:31 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीतील संभाव्य भूमिकेबाबत राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रात जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. तसेच फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले. पत्रकार म्हणाले तुम्ही दिल्लीत जाणार अशा चर्चा आहेत. यावर मुख्यमंत्री म्हणाले “मी परवाच दिल्लीला जाऊन आलो.” त्यांनी या चर्चांवर विनोदी पद्धतीने भाष्य केले.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी निर्णयावरही भूमिका स्पष्ट केली. महात्मा फुले योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या आणि नंतर थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. या निर्णयाचे स्वागत केल्याबद्दल त्यांनी शरद पवार यांचे आभारही मानले.

Published on: Jul 11, 2026 3:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us