Dhananajay Munde : ‘आग तो लगी थी घर में…’, शायरीतून मुंडेंनी केल्या भावना व्यक्त, बघा दमदार भाषण

Dhananajay Munde : ‘आग तो लगी थी घर में…’, शायरीतून मुंडेंनी केल्या भावना व्यक्त, बघा दमदार भाषण

| Updated on: Oct 02, 2025 | 2:52 PM

दसरा मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी आग तो लगी थी घर में... ही शायरी सादर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर राहण्याचा संदेश दिला. भाषणाच्या समारोपात, मुंडे यांनी भगवानगडासाठी १० एकर वन विभागाची जागा मिळाल्याची घोषणा केली.

दसरा मेळाव्यात राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत, धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधून घेतले. त्यांनी आग तो लगी थी घर में…. ही शायरी सादर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या शायरीच्या माध्यमातून, संकटातून मार्ग काढून पुढे जाण्याचा आणि आलेल्या अडचणींना सामोरे जाण्याचा सकारात्मक संदेश त्यांनी दिला. हर मुश्किल को हसते हसते झेलते है हम. हम आंधियों में भी चिराग जलाते चलते है या ओळींमधून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहण्याची आपली वृत्ती दर्शवली. मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रसंत भगवान बाबांचा जयजयकार केला.

यानंतर त्यांनी एक महत्त्वाची आणि आनंदाची घोषणा केली. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या भगवानगडासाठी १० एकर वन विभागाची जागा आता मंजूर झाली आहे. मुंडे साहेब यांच्या काळापासून यासाठी प्रयत्न सुरू होते, आणि आता ताईंच्या प्रयत्नांमुळे तसेच स्वतःच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

Published on: Oct 02, 2025 02:52 PM