Pakistan : मध्यरात्री प्रेस कॉन्फरन्स, भारत हल्ला करणार सांगितलं… पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा, घेतला मोठा निर्णय!

Pakistan : मध्यरात्री प्रेस कॉन्फरन्स, भारत हल्ला करणार सांगितलं… पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा, घेतला मोठा निर्णय!

| Updated on: May 03, 2025 | 5:32 PM

पाकिस्तान सोबतची डाकसेवा बंद करण्याचा निर्णय सुद्धा भारताने घेतलेला आहे. पाकिस्तानी वेबसाइट्सवर सुद्धा बंदी घालण्याचा विचार भारताने केला आहे. कलाकार क्रिकेटर्स यानंतर आता पाकच्या राजकीय नेत्यांची अकाऊंट्स देखील बॅन करण्यात आली आहेत.

भारताने पाकिस्तान सोबत डाकसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पाकिस्तानच्या वेबसाइट्सवर ही बंदी घालणार आहे. तर मध्यरात्री प्रेस कॉन्फरन्स घेणार्‍या पाकिस्तानच्या एका मंत्र्यांचे अकाऊंट बॅन करण्यात आले आहे. पाकिस्तानचे माहिती व प्रसारणमंत्री अब्दुल्ला तरार यांचे ट्विटर अकाऊंट भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. भारत सरकारने सर्व पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. पाकिस्तानी कलाकार आणि क्रिकेटर्सचे सोशल मीडिया अकाऊंट बॅन करण्यात आले.

क्रिकेटर बाबर आजम, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद रिझवानचे इन्स्टाग्राम भारतात बंद केले. पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंटही भारतात बॅन करण्यात आले आहेत. माहिरा खान, हानिया आमिर, अली जफर, सजल अलीचे अकाऊंट बंद झाले. माया अली, इकरा अजीज, सानम सईदयांच्या अकाऊंटवरही बंदी घालण्यात आली. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे YouTube चॅनल भारतात बंद करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांचा इन्स्टाग्राम अकाऊंटही बॅन करण्यात आलं आहे. याआधी पाकिस्तानच्या 16 YouTube चॅनलवर भारत सरकारने बंदी घातली होती.

Published on: May 03, 2025 05:32 PM