Mahadev Munde Case : मोदी म्हणताय ऑपरेशन सिंदूर… पण माझ्या सिंदूरचं काय? ज्ञानेश्वरी मुंडे भावूक अन्…

Mahadev Munde Case : मोदी म्हणताय ऑपरेशन सिंदूर… पण माझ्या सिंदूरचं काय? ज्ञानेश्वरी मुंडे भावूक अन्…

| Updated on: Jul 16, 2025 | 3:42 PM

महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने पूर्ण झाल्यानंतरही आरोपी अटक होत नसल्याने मुंडे कुटुंबीय आक्रमक झालेत. अशातच आज सकाळी महादेव मुंडेच्या पत्नीने विष प्राशन करत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर बेशुद्ध अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यातील परळीतील महादेव मुंडे यांची 18 महिन्यांपूर्वी परळी शहरात निर्घृण हत्या झाली होती. 18 महिन्यानंतर देखील हत्या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झालेले नाहीत. यासंदर्भात वेळोवेळी महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाने पोलिसांना भेटून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. मात्र तपासामध्ये काहीच निष्पन्न होत नसल्याने आज कुटुंब आक्रमक होतं आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले होते.

दरम्यान, पोलीस अधीक्षकांची भेट झाल्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माझ्या सिंदूरला न्याय द्या, अशा प्रकारची मागणी केली आहे. आतापर्यंत महादेव मुंडे हत्या प्रकरणात 7 तपास अधिकारी बदलले. CID मार्फत चौकशी करू असं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली आहे. 18 महिन्यांपूर्वी महादेव मुंडेंची हत्या झाली मात्र अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, म्हणून त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करुन स्वत:ला संपवण्याच प्रयत्न केला. बेशुद्धअवस्थेत त्यांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

Published on: Jul 16, 2025 03:42 PM