ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम

ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम

| Updated on: Jul 30, 2025 | 6:34 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. हे १ ऑगस्टपासून लागू होईल. भारताचे उच्च आयात शुल्क आणि रशियाशी असलेले व्यापारी संबंध यांना ट्रम्प यांनी या निर्णयाचे कारण म्हणून सांगितले आहे. यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत-अमेरिका व्यापार संबंधांवर या निर्णयाचा गंभीर परिणाम होईल.

अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराबाबत एकतर्फी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने भारतावर २५ टक्के कर लादला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. ट्रम्प म्हणाले की, १ ऑगस्टपासून भारतावर लागू होईल. खरंतर, भारत आणि अमेरिकेत व्यापार कराराबाबत बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती . आता ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याबद्दल माहिती दिली आहे.

आपल्या एक्स अकाऊंटवर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटलं आहे की, भारत हा आपला मित्र देश असला तरी, आपण त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे आणि त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि त्रासदायक गैर-आर्थिक व्यापार अडथळे आहेत. तसेच, त्यांनी नेहमीच त्यांचे बहुतांश लष्करी साहित्य रशियाकडून खरेदी केले आहे आणि ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, चीनसह, ज्या वेळी सर्वजण रशियाला युक्रेनमधील हिंसा थांबवण्यास सांगत आहेत. हे सर्व काही चांगले नाही! त्यामुळे, भारताला 1 ऑगस्टपासून 25% आयात शुल्क तसेच वरील कारणांसाठी दंड आकारला जाईल. भारताने रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केलं तर दंड लावण्यात येईल, असं आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हंटलं आहे.

Published on: Jul 30, 2025 06:33 PM