Nagpur News : नागपुरात ईडीकडून 2 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण?

Nagpur News : नागपुरात ईडीकडून 2 ठिकाणी छापेमारी; काय आहे प्रकरण?

| Updated on: May 23, 2025 | 7:02 PM

ED Raid In Nagpur : नागपुरात ईडीकडून आज धाड सत्र राबवण्यात आलं आहे. प्रतिष्ठित सराफा व्यापऱ्यांवर ईडीची धाड पडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

नागपुरमध्ये आज दोन ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. इतवारी परिसरातील सागर ज्वेलर्सवर ईडीने धाड टाकली. सराफा असोसिएशनच्या माजी अध्यक्षांच्या ज्वेलर्स दुकानांवर हा छापा टाकण्यात आलेला आहे. तसंच कॅश हवाला करणाऱ्या शैलेश लखोटिया याच्यावर देखील छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.

ईडीचे पथक नागपुरात गुरूवारीच दाखल झाले होते. त्यानंतर शुक्रवारी या पथकाने ईडीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सोबत घेत शहरात धाड सत्र सुरू केलं. सराफा असोसिएशनच्या माजी अध्यक्षांच्या यांच्या इतवारीतील सागर ज्वेलर्सवर छापा मारून ईडीने कारवाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी डीआरआयने केलेल्या कारवाईमुळे सदरचे व्यापारी चर्चेत आले होते. त्यातच आजच्या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कॅश हवाला करणाऱ्या शैलेश लखोटिया याच्यावर देखील छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे.

Published on: May 23, 2025 07:02 PM