एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार? ट्विटच्या माध्यमातून केला खुलासा; म्हणाले, मी भाजपमध्ये…

एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार? ट्विटच्या माध्यमातून केला खुलासा; म्हणाले, मी भाजपमध्ये…

| Updated on: Feb 13, 2024 | 6:01 PM

भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र यावर स्वतः खडसेंनी ट्वीट करून खुलासा केला आहे. खडसे म्हणाले, गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार....

मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे भाजपात येणार असल्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या होत्या. इतकच नाही तर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र यावर स्वतः खडसेंनी ट्वीट करून खुलासा केला आहे. ‘गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.’, असे त्यांनी म्हटले.

Published on: Feb 13, 2024 06:01 PM