Eknth Shinde : दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknth Shinde : दोन्ही सेना अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 16, 2025 | 3:13 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यात युती झाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि रिपब्लिकन सेना यांच्यातील युतीची घोषणा करताना लोकांच्या हितासाठी एकत्र आल्याचा दावा केला. ते म्हणाले, आमच्यात परस्पर विश्वास आहे. महाराष्ट्रात दोन सेना आहेत – शिवसेना आणि रिपब्लिकन सेना. या दोन्ही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर लढणाऱ्या सेना आहेत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे, तर रिपब्लिकन सेना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसा घेऊन चालते. त्यामुळे आमची ही युती उत्तम जुळेल.

यावेळी शिंदे यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख ‘DCM – डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असा करत सर्वसामान्यांशी असलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे वारस आहेत. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसामान्य माणूस आज सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकला आहे. मी स्वतःही या संविधानामुळेच मुख्यमंत्री होऊ शकलो. शिंदे यांनी या युतीमुळे सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Published on: Jul 16, 2025 03:13 PM