BIG Breaking : एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका, कार बॉम्बने उडवणार; कोणी दिली जीवे मारण्याची धमकी?
एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची माहिती मिळत आहे.
शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात एक मोठी बातमी आहे. एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याची एक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात यासंदर्भात धमकीचा ई-मेल आल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाहीतर मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात आलेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून या मेलचा अधिकचा तपास सुरू आहे. मंत्रालय पोलीस, जेजे मार्ग पोलीस ठाण्याला देखील हा धमकीचा मेल मिळाला आहे.
