Saamana : एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार, हे भूत कोणाच्या मानगुटीवर बसतं… सामनातून सरकारवर निशाणा
सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून एप्स्टिन कांडामुळे भारतात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असा दावा करण्यात आला आहे. जेफ्री एप्स्टिनचे भूत १९ डिसेंबरला अमेरिकन संसदेतील फायलींमधून बाहेर पडेल आणि भारतात येऊन कोणाच्या मानगुटीवर बसते, हे पाहावे लागेल, असे सामनामध्ये म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा हवाला देत पंतप्रधानांमध्ये बदल होण्याची शक्यताही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून एप्स्टिन कांडामुळे भारतात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असा दावा करण्यात आला आहे. सामनाने आपल्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा साधला आहे. जेफ्री एप्स्टिनचे भूत १९ डिसेंबरला अमेरिकन संसदेत हजारो फायलींमधून बाहेर पडेल आणि मोकाट सुटेल असे म्हटले आहे. हे भूत भारतात येईल आणि कोणाच्या मानगुटीवर बसते किंवा कोणाचा गळा आवळते हे पाहावे लागेल, असे सामनातून म्हटले गेले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही एप्स्टिन फाईल्समध्ये भारतातील काही प्रमुख राजकारणी आणि आजी-माजी खासदारांचा समावेश असल्याने भारतीय राजकारणात मोठे धक्के बसतील, असे विधान केले आहे. चव्हाण यांच्या वक्तव्याचा हवाला देत, एप्स्टिन कांडामुळे राजकीय उलथापालथ होऊन पंतप्रधान बदलले जाण्याची शक्यताही सामनातून व्यक्त करण्यात आली आहे.
Published on: Dec 19, 2025 11:56 AM
