Ganesha Idols : नागपुरात पर्यावरण पुरक बाप्पांच्या मूर्तींचे प्रदर्शन, मूर्तीच्या किंमतीत 25 ते 30 टक्के वाढ
नागपूर महापालिकेच्या आदेशानुसार मातीच्या मूर्ती बसवणे अनिवार्य आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे पर्यावरण पुरक मूर्तीची जास्त मागणी आहे.
नागपुरात बाप्पाच्या पर्यावरण पुरक मूर्तीचं प्रदर्शन करण्यात आलंय. बाप्पाच्या मूर्तीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येतं. मातीच्या मूर्तींकडे नागपूरकरांचा कल आहे. शहरात गणेश मूर्तीचे प्रदर्शन लागले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येतोय. त्याचा तयारीही सुरु झालीय. नागपुरात ठिकठिकाणी पर्यावरण पुरक बाप्पाच्या मूर्तींचे प्रदर्शन लागले आहे. यंदा श्रींच्या मूर्तीच्या किंमतीत 25 ते 30 टक्के वाढ झालीय. नागपूर महापालिकेच्या आदेशानुसार मातीच्या मूर्ती बसवणे अनिवार्य आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे पर्यावरण पुरक मूर्तीची जास्त मागणी आहे. अशी माहिती निलेश साबळे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांत बरीच भाववाढ झाली. त्यामुळं झालेली दरवाढ काही नवी नाही.
Published on: Aug 17, 2022 07:53 PM
